इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीकडून घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी निवडणुकीचे फॉर्म घेऊन बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्यात येणार असल्याचा संदेश देण्यात आला. निवडणूक लढण्याच्या तयारीसाठी आणि त्यासंदर्भात नियोजनासाठी घोटी येथे तालुका पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हा नेते पांडुरंग बऱ्हे, तालुका संघटन सरचिटणीस तानाजी जाधव, सरचिटणीस कैलास कस्तुरे, संजय झनकर, माजी तालुकाध्यक्ष नंदु गाढवे, युवा तालुकाध्यक्ष रवींद्र गव्हाणे, युवा तालुका सरसिटणीस भाऊसाहेब धोंगडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, जिल्हा नेते प्रकाश सोनवणे, घोटी शहराध्यक्ष जगन भगत, अडसरे बुद्रुकचे सरपंच संतु साबळे, तानाजी पाटील गाढवे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group