इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती बहिरू लगड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पध्दतीने झालेल्या निवडीत कुसुम पांडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच सचिन बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या सभेत आरती लगड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक गोपाल चौधरी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्पना डेंगळे, सारिका जोशी, भरत मुकणे, कुसुम पांडे, अशोक धोंगडे आदी उपस्थित होते. उपसरपंच निवडीचे रामदास भुसेकर, प्रकाश लगड, श्रीपत लगड, कैलास लगड, कचरू काळे, मनोज जोशी, नामदेव लगड, रंगनाथ लगड, नवनाथ निर्मळ, सचिन लगड, रमेश पांडे आदींनी स्वागत केले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group