प्रत्येक शासकीय कार्यालयावर स्वयंचलित एअर एनर्जीचा मोडाळे येथील प्रयोग यशस्वी : गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी कार्यालयांत मिळणार २४ तास फुकट वीज

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – नासिक जिल्ह्यातील मोडाळे ता. इगतपुरी येथे सर्व शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये एअर एनर्जीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे शासकीय कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. यासह विजेसाठी येणारा मोठा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. २४ तास मुबलक विजेमुळे ग्रामीण भागात लोडशेडींगची कटकट आता संपली आहे. नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाचा यशस्वी प्रयोग असून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या अथक प्रयत्नांनी हा आगळावेगळा प्रयोग साकारला आहे. विविध दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने ह्या प्रयोगाला मोठे बळ लाभले असल्याने गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत. एअर एनर्जी एक महत्वपूर्ण ऊर्जा स्रोत असून वायुचलित जेनरेटरद्वारा वीज उत्पन्न केली जात आहे. एअर एनर्जी मधून उत्पादित केलेली ऊर्जा विद्युत शक्तीमध्ये रूपांतरित करून त्याद्वारे इतर विविध उपयोगांमध्ये वापर केली जाणार आहे.

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी याबाबत अधिक माहिती दिली. एअर एनर्जीच्या उपयोगामुळे वातावरणीय प्रदूषणाचा नाश होतो. अन्य प्रकारच्या ऊर्जा स्रोतांशी तुलना करता ह्यामुळे उत्पन्न झालेली वीज नैसर्गिक आहे. एअर एनर्जी उत्पन्न करण्यामुले प्रदूषण कमी होण्यास हातभार लागून वीज ह्या राष्ट्रीय संपत्तीची बचत होणार आहे. एअर एनर्जीमुळे वीजबिलांचा खर्च वाचून अधिक सुरक्षितता मिळणार आहे. एअर एनर्जीचे पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून अनेक फायदे आहेत. त्यामध्ये वातावरणीय प्रदूषण कमी होऊन शून्य उत्पादनखर्च करून मुबलक वीज मिळते हा मोठा फायदा आहे. ह्या प्रयोगासाठी सहाय्यक असलेल्या सर्वांचे गोरख बोडके यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!