
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुका खरेदी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी पांडुरंग रामचंद्र खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, इंदिरा काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे, चेअरमन ज्ञानेश्वर लहाने आदींच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली आहे. अतिशय अल्पावधित कऱ्होळे गावात विकासाचे बहुमोल कार्य करणारे माजी सरपंच पांडुरंग रामचंद्र खातळे यांचे निवडीबद्धल इगतपुरी तालुक्यात अभिनंदन सुरु आहे. यापूर्वी पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली कऱ्होळे ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळालेले असून संचालकपदाच्या माध्यमातून कऱ्होळे गावाला फायदा होणार आहे. पांडुरंग खातळे यांचे इगतपुरी तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.