टिटोली येथे शिवजयंती निमित्ताने ग्रामसंसद भवन आणि विविध विकासकामांचे उदघाटन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – शिवजयंतीच्या पावन पर्वावर इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसंसद भवन ह्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, मजुर फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर लहाने, प्रशांत कडू, शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन बाळासाहेब वालझाडे आदी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण कार्यकम संपन्न झाला. आमदार हिरामण खोसकर यांनी आगामी काळात टिटोली गावासाठी सभामंडप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला.

कार्यक्रमावेळी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, मिस्टर इंडिया फेम सुहास खामकर, ठाकरे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी उपसभापती विठ्ठल लंगडे, अरुण भागडे, नंदलाल भागडे, रामदास भोर, पत्रकार भास्कर सोनवणे, ॲड. हनुमान मराडे, कैलास कडू, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक भगिरथ भगत, सिध्देश्वर आडोळे, सचिन लंगडे, माणिकखांबचे सरपंच शाम चव्हाण, हरीश चव्हाण, सरपंच काजल गभाले, उपसरपंच अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गभाले, माया भडांगे, ज्योती बोंडे, कोमल हडप, ग्रामसेविका स्वाती गोसावी ग्रामस्थ, युवक, महिला आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन धनराज म्हसणे यांनी तर आभार उपसरपंच अनिल भोपे यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!