
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – ओमानंद नगर घोटी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरत्न मित्र मंडळ आयोजित या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. छत्रपतींनी केलेल्या पराक्रमाची माहिती देत संभाषणामध्ये सहभागी झालेल्या आणि पोवाडा गायन केलेल्या विद्यार्थ्यांना शिवरत्न मित्र मंडळातर्फे शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. संस्कृती जपत चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वांनी भगवा फेटा मस्तकी टिळा, सफेद व भगवा कुर्ता, वेगवेगळ्या मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या आनंदात जयंती साजरी केली. पोवाडा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्री. मंदार सर यांनी सूत्रसंचालन केले. शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.