लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – मुंबई agrab महामार्गापासून अगदी जवळ असलेल्या गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाब्याजवळील प्राचीन कालीन महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची वर्दळ वाढली आहे. दरवर्षी लहान थोरांसह अबाल वृद्ध भाविकांची मांदियाळी याठिकाणी दाखल होत असते. या मंदिरात सकाळपासूनच भगवान शंकराची यथोचित पूजा आरती करण्यात येते. हेे महादेव मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. अनेकांची मंदिरावर श्रद्धा असून, प्रत्येकाला धार्मिक कार्याची प्रेरणा यातून मिळत असते. सर्वतीर्थ टाकेद तसेच त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दूरवर जाण्यापेक्षा भाविक भक्त महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी या मंदिरात येऊन दर्शन घेतात. ओल्ड प्रभू हॉटेलचे संचालक बंडोपंत लिंबाजी चाटे हे सन १९७० पासून दररोज सकाळ सायंकाळी न चुकता नियमितपणे मंदिराची पूजा आरती करतात. मंदिरात अनेकांच्या मनोकामना, आकांक्षा पूर्ण होतात असे ओल्ड प्रभुचे संचालक विलास भाऊ चाटे नेहमी सांगतात. नाशिक महामार्गावरून येणारे साधू संत देखील येथे दर्शनासाठी थांबतात. शिर्डीकडे जाणारी साई पालखी, साधू संतांना ओल्ड प्रभू ढाब्याच्या वतीने नेहमीच अन्नदान केले जाते. हे मंदिर अगदी छोटे असून मंदिराचा विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group