
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रात दर्जेदार शिक्षणातून व सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ह्याच सामाजिक दायित्वाचे पुढचे पाऊल म्हणजे ह्या संस्थेद्वारे एका अद्ययावत हॉस्पिटलची स्थापना नव्या वर्षात होत आहे. नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला ह्या हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाचे उदघाटन प्रसिद्ध बाल शल्यचिकित्सक व मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख ह्यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. नाशिककरांसाठी अद्ययावत सुविधा ह्याठिकाणी उपलब्ध असणार आहेत अशी माहिती संस्थेने दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महासंचालक डॉ. मो. स. गोसावी असणार आहेत. ह्याप्रसंगी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ डॉ. रमेश भारमल, डॉ. शिरीष देशपांडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. आर. पी. देशपांडे, संस्थेचे प्रकल्प संचालक पी. एम. देशपांडे असणार आहेत. ह्या कार्यक्रमाला नाशकातील ॲड. जयंत जायभावे, प्रशांत अमीन, डॉ. प्रकाश पाठक, डॉ. राहुल फाटे, डॉ. एस. पी. कल्लुरकर डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. जगदीश हिरेमठ, एस. आर. रहाळकर, प्राचार्य डॉ. व्ही. एम. गोविलकर उपस्थित राहणार आहेत. गो. ए. संस्थेच्या एचआर डायरेक्टर प्राचार्या डॉ. दीप्ती देशंपाडे, नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, मुंबई विभागाच्या सचिव डॉ. सुहासिनी संत, प्राचार्य पी. ए. राऊत, आस्थापना संचालक एस. एम. गोसावी आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित असतील.