इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील व्हीटीसी फाटा ते रायगडनगर ह्या गावापर्यंत मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजुंचा प्लास्टिक कचरा जमा करून स्वच्छता करण्यात आली. ह्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा मुक्या जनावरांकडून खाल्ला जात असल्याने त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. यासह ह्या प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे संपूर्ण परिसरात विखरलेले प्लास्टिक भयंकर संकट ठरत आहे. ह्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वच्छता अभियान यशस्वी झाले. ह्या अभियानात सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, डेल्टा कंपनीचे व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी, निडो कंपनीचे कर्मचारी ह्या सर्वांनी सहभाग घेतला. ह्यानुसार परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून स्वच्छता करण्यात आली. ह्या उपक्रमाचे वाहनधारक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे, संजय पवार यांनी वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीच्या उपक्रमाबद्धल विशेष कौतुक केले. आगामी काळात अधिकाधिक चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत हद्धीत लोकांना समाधान वाटेल असे कार्य उभे करण्याचा निर्धार सर्व सहभागी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group