घोटी पोलिसांची कामगिरी : बोरीचीवाडी येथील हातभट्टीवर छापा टाकून ५७ हजारांची दारू केली नष्ट : सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली दारूच्या भट्ट्या उध्वस्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. – घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेअंतर्गत कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार गावठी दारूच्या हातभट्ट्या व गावठी दारू तयार करणाऱ्या भागात सूक्ष्म नियोजन करून डाव उधळून लावत धडाकेबाज कारवाई सुरू आहे. बेकायदेशीरपणे गावठी दारू निर्मात्यांना यामुळे चांगलीच चपराक मिळाली आहे. अवैध दारू विकणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले. घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीचीवाडी येथील जंगलात सोमवारी गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर घोटी पोलिसांनी छापा टाकला. यात गावठी दारू बनविण्यासाठी सडवलेले रसायन 200 लिटरचे ड्रम असे 57 हजार किमतीची दारू पोलिसांनी यावेळी नष्ट केली.

सदर आरोपीकडून विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे हातभट्टी साहित्य, तयार गावठी दारू असे 57 हजाराचे साहित्य मिळून आले. आरोपी सुभाष सावळीराम खोडके रा. देवाची वाडी खेडभैरव यास  पोलिसांची चाहूल लागताच तो जंगलात पसार झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय एम. जी. जुंद्रे करीत आहे. घोटी पोलीस ठाण्यात नोहेंबरमध्ये दारूच्या एकूण 28 केस दाखल असून त्यापैकीव बारा केसेस गावठी हातभट्टीच्या झाल्या आहेत. त्यात पाच लाख 85 हजार चारशे रुपयांचे रसायन व साहित्य साधने नष्ट केली. देशी विदेशी गावठी दारू विक्री व बाळगण्यासंबंधित 16 केसेस केल्या आहेत. त्यामध्ये 70 हजार सातशे 95 रुपयांचा मुद्देमाल असून दोनशे सोळा लिटर गावठी दारू 21 हजार सहाशे रुपयांची पोलिसांनी आतापर्यंत नष्ट केली आहे. 51 हजार 195 देशी विदेशी दारू  जप्त करण्यात देखील घोटी पोलिसांना यश मिळाले आहे

Similar Posts

error: Content is protected !!