इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सुचनेनुसार इगतपुरी आणि घोटी ग्रामीण रुग्णालयात शालेय नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 74 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 57 विद्यार्थ्यांध्ये दृष्टीदोष असून चष्म्यासाठी संदर्भित करण्यात आले. त्यांना 3 डिसेंबरला चष्मे वाटप होणार आहेत. 17 विद्यार्थ्यांमध्ये तिरळेपणा Ptosis -1 Micropthalmus-2 आढळले. घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे नेत्र तपासणी शिबीर पार पडले.
इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन केले. सर्व आरोग्य कर्मचारी, नेत्र चिकित्सक डॉ. शरद बगदानी, RBSK पथक प्रमुख डॉ. दत्ता देवकाते, डॉ. तेजस निकम, डॉ. मुकेश सोनवणे, डॉ. सिद्धार्थ मोरे, डॉ. सुनयना निकम, डॉ. चारुशीला बागुल, सुवर्णा सोनवणे, संदीप ओझरकर, निरंजन नाईक, गटसाधन केंद्र विशेष तज्ञ स्मिता खोब्रागडे, उत्तम आंधळे, विशेष शिक्षक बाप्पा गतीर, संदीप शिरसाठ, योगेश शिंदे, निलाक्षी शेलार यांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.