इको मॉन्डेला स्कुलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची धामडकीवाडी शाळेला भेट : द्वितीय सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 10

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दिवाळी सुट्टीनंतर सुरु झालेल्या द्वितीय सत्राचा पहिला दिवस मौज मजेत सुरु झाला. मुंबई येथील ॲडव्हेन्चर एज्युकेशनल टूरच्या साहाय्याने इको मॉन्डेला स्कुलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत भेट दिली. मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी शाळेची प्रगती सांगून वाडीची माहिती दिली. इको मॉन्डेला स्कुलच्या शिक्षकांचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले.

इको मॉन्डेला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वाडीतील कुटुंबांना भेटी देऊन इथले लोकजीवन समजून घेतले. यासह शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गाणी, गोष्टी, खेळ, खाऊ वाटप करण्यात आले. यामुळे धामडकीवाडी शाळेतील द्वितीय सत्राचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना आनंद देणारा ठरला. याप्रसंगी शाळेचे सहकारी शिक्षक दत्तू निसरड, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, लहानु आगिवले व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!