
इगतपुरीनामा न्यूज, दि. 3
नाशिक जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय रामू राव आणि व्हॉइस चेअरमनपदी उषा भारत देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली मैद यांनी बिनविरोध निवडीची घोषणा करताच सभासद आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची समजली जाणारी ही पतसंस्था प्रमुख अर्थवाहिनी आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपला पॅनलचे सर्व ९ उमेदवार विक्रमी बहुमताने निवडून आले होते. आधीच २ महिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. २५ वर्षाच्या सत्तेत प्रथमच परिवर्तन होऊन आपला पॅनल सत्तेत आले. ह्या पार्श्वभूमीवर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय रामू राव आणि व्हॉइस चेअरमनपदी उषा भारत देवरे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नवनियुक्त संचालक प्रशांत अहिरराव, रमेश देशमुख, नामदेव वाणी, मधुकर शेरेकर, रमेश आवारी, सिताराम साबळे, पृथ्वीराज भामरे, सतीश अहिरराव, पल्लवी कुलकर्णी आणि पतसंस्थेचे सचिव नितीन गायकवाड उपस्थित होते.
