
इगतपुरीनामा न्यूज, दि. 1
इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा पांडुरंग खातळे यांची बिनविरोध निवडणूक झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कऱ्होळे ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण पॅनल निवडून आलेले आहे. सरपंचपदी अशोक आघाण यांची यापूर्वीच निवड झालेली आहे. उपसरपंचपदी आशा पांडुरंग खातळे यांच्या बिनविरोध निवडीचे कऱ्होळे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी आशा पांडुरंग खातळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लता आघाण, मंदाबाई लाव्हरे, अंकुश आघाण, पंढरीनाथ खेताडे, नीलम भवर, जावीद शेख उपस्थित होते.