इगतपुरीनामा न्यूज, दि. 1
माझ्या तालुक्यातील अतिदुर्गम भागासह नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना पेहेचान प्रगती फाऊंडेशन मुंबईच्या वतीने प्रगती सन्मान पुरस्कार ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले याचा मला अभिमान वाटतो. इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सजग, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुदृढ करण्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो. पुढील काळात शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे याची ग्वाही देतो असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी केले. पेहेचान प्रगती फाउंडेशन आयोजित प्रगती सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा झालेला सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो असेही ते म्हणाले.
पहेचान प्रगती फाऊंडेशन मुंबईच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा म्हणाल्या की, अतिदुर्गम, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसेवेचे व्रत धारण करून प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या तमाम शिक्षक बंधु भगिनिंना सन्मानित करण्यासाठी आमची सेवाभावी संस्था कायम वचनबद्ध आहे.आगामी काळात शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा पुरविण्याबरोबरच दरवर्षी शिक्षकांचा सन्मान करणे आमच्या संस्थेच्या अजेंड्यात समाविष्ट आहे. केंद्रप्रमुख श्रीराम आहेर म्हणाले की, क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करीत असतांना आजच्या प्रगती सन्मान सोहळ्यात माझ्या दोन्ही केंद्रातील शिक्षकांचा माझ्यासह सन्मान होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. पेहेचान प्रगती फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे खरोखर मी आभार मानतो. व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रगती अजमेरा, राधा रुंगठा, गुरुदेव कौर, मीना अग्रवाल, लुभावनी सखुजा, मीना रुईया उपस्थित होते.
इगतपुरीसह नाशिक जिल्हाभरात शैक्षणिक क्षेत्रात उच्चतम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रगती सन्मान पुरस्कार मान्यवरांनी प्रदान केला. गुणवंत शिक्षक नांदगाव सदोचे केंद्रप्रमुख श्रीराम गंगाधर आहेर, सौरभ माधवराव अहिरराव, वृषाली भीमाशंकर आहेर, अमोल अशोक बावा, योगिता मुरलीधर हाके, प्रकाश दुबलू ठाकरे, निर्मला गंगाधर वाघ, पांडूरंग जेजीराम अहिरे, राजेंद्र रामचंद्र ठोंबरे, मनोज शांताराम नेरकर, संजय येशी, प्रियदर्शिनी कैलास बोढारे, नरेंद्र सोनवणे, विलास जगन्नाथ गवळे, रेखा शिवाजी थेटे, सविता संपतगीर गोसावी, प्रतिभा नानाजी सोनवणे, मंगला विष्णू धोंडगे, खंडु नानाजी मोरे, उमेशचंद्र खेडकर, प्रदिप अमृतराव देवरे, प्रमोद पांडुरंग परदेशी, सिद्धार्थ सोमा सपकाळे, कविता तुकाराम गभाले, सतिश टेकुडे यांना प्रगती सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार भास्कर सोनवणे यांनी तर आभार सिद्धार्थ सपकाळे यांनी मानले.