सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. 30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत वेळुंजे येथील वॉर्ड क्र. ३ ची जागा बिनविरोध झाल्याने तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. परंपरागत आमने सामने लढत असलेले शिवसेना नेते समाधान बोडके पाटील व राष्ट्रवादी नेते हरिभाऊ बोडके यांची लढत गेल्या 20 वर्षापासून कायमच तालुक्यात चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु यावेळी शिवसेना नेते तथा माजी सरपंच समाधान बोडके पाटील यांनी ही निवडणूक हातात घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली जागा बिनविरोध करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. यामध्ये वॉर्ड क्र ३ मधून हरिभाऊ बोडके, शिवसेना वाघेरा गण प्रमुख अशोक नथु उघडे, राम उघडे, तसेच वॉर्ड क्र 1 मधून पिंटू निरगुडे या जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. राजकारणात कोणीही कोणाचे आजन्म शत्रू नसते. गेल्या 20 वर्षांपासून सत्ता राखण्यात यश आले. गावाने सेवा करायची संधी दिली. त्यामुळे गावात कामेही निश्चित चांगले झाले आहेत. कार्यकर्त्यांचा मान राखत आणि गाव एक संघ ठेवण्यासाठी आजची निवडूनक बिनविरोध करण्यात यश आले याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते समाधान बोडके पाटील यांनी दिली.