गोरखभाऊ बोडके युवा मंचातर्फे कातकरी कुटुंबांना किराणा साहित्याचे झाले वाटप
इगतपुरीनामा न्यूज, दि. 10
आदिम आदिवासी कातकरी समाजातील विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून ते प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नाशिक येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, श्रमजीवी संघटना आणि अन्य आदिवासी संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैतक घेण्यात येईल. गोरख बोडके यांच्या सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही विनाविलंब करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावित यांनी दिले. इगतपुरी तालुक्यातील उभाडेवाडी येथील कातकरी वस्तीतील 20 कुटुंबांना गोरखभाऊ बोडके युवा मंचातर्फे एक महिन्याचे किराणा साहित्याचे वाटप आज करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी मंत्री ना. गावित यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते. इगतपुरी तालुक्यातील विविध आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरख बोडके उचललेल्या पावलांबाबत आदिवासी संघटनांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. कातकरी कुटुंबांना किराणा मिळाल्याने त्यांनीही गोरख बोडके यांचे आभार मानले.
इगतपुरी तालुक्यात जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके हे विविध सामाजिक आणि आदिवासी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे असतात. त्यानुसार उभाडेवाडी येथील कातकरी कुटुंबाला बोडके यांनी भेट देऊन विचारपूस करून दिलासा दिला. त्या पीडित कुटुंबासह अन्य 20 कातकरी कुटुंबाला एक महिन्याचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रमजीवी संघटनेचे नेते संजय शिंदे, गोकुळ हिलम, आदिम कातकरी संघटनेचे सुनील वाघ, महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, रायूकाँ युवक तालुकाध्यक्ष हरीश चव्हाण, कावनईचे सरपंच गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावित यांच्याशी संवाद साधल्याने श्रमजीवी संघटना आणि अन्य आदिवासी संघटना यांनी गोरख बोडके यांचे आभार मानले.