इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन राजमाता जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. व्यासपीठावर वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, राजमाता जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माधव नाठे, जानोरीचे उपसरपंच आनंद जाधव, शिवसेना नेते राजाराम नाठे, समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, मुख्याध्यापक बी. एल. वाघ, निवृत्त सैनिक विजय कातोरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गायधनी, भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे, पत्रकार भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे लेझिमच्या तालात व स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाडीवऱ्हे येथील दहावी, बारावीमध्ये उत्कृष्ठ गुण मिळवून प्रथम पाच क्रमांकामध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका माधुरी पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार भास्कर सोनवणे, विजय कातोरे, विनोद नाठे, रोहिदास कातोरे, आत्माराम मते, शरद सोनवणे, माधव नाठे यांनी शिक्षक म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळेच शिक्षकांबाबत प्रत्येकाच्या मनात आदर आहे असे मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका कदम, मालुंजकर, मधुकर शिंदे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.