ती बावरली अन हरवली… नाशिकऐवजी इगतपुरीत आली : किरण फलटणकर यांच्या मदतीने महिलेला कुटुंबियांकडे केले सुपूर्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

योगिता दिपक कोल्हे ही महिला रेल्वेने जळगाव ते नाशिक प्रवास करीत होती. गाडीला जास्त गर्दी असल्याने नाशिक येथे उतरतांना तिचा मोबाईल पडला. अन त्याच वेळी गाडी चालू झाल्याने इगतपुरी येथे ती उतरली. पहिलाच मोठा प्रवास.. कमी अनुभव आणि मोबाईल नसल्याने ती खूपच बावरली. घबराट तर तिच्या चेहऱ्यावर होतीच.. एकीकडे तिच्या कुटुंबियांनी ही बाब इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब सुराणा यांना सांगितली. त्यांनी तातडीने ही माहिती इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांना दिली. श्री. फलटणकर हे रक्तात जनसेवा भिणलेले हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ह्या महिलेचा शोध रेल्वे स्थानकात घेण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकावरील गुप्ता कॅटरिंगचे बबलु तिवारी, लोहमार्ग ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांना कळवले. या सर्वांनी तातडीने शोध घेत ही महिला सुखरूप शोधली. नाशिकहून काही वेळात तिचे पती दिपक कोल्हे आल्यानंतर महिलेला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याकामी प्रभारी लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन बनकर, हेमंत घरटे, महिला पोलीस नाईक सुजाता निचड, प्रमोद आहाके, निरज शेंडे, विशाल बडे, अरुणा सानप आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. किरण फलटणकर यांनी तत्परतेने धावपळ करून मदत केल्याबद्धल दीपक कोल्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यासह श्री. फलटणकर यांचे इगतपुरी तालुक्यात कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!