गुन्ह्यांना आवरणारा महत्वाचा दुवा पोलीसच – पोलीस निरीक्षक अनिल पवार : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

विविध प्रकारच्या विपरीत घटना आणि गुन्ह्यांना आवर  घालणारा महत्वाचा दुवा म्हणजे पोलीस होय. पोलीस ही राष्ट्राची संपत्ती असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातो. देशाचा अभिमान बाळगून काम करणाऱ्या पोलिसांचा समाजाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलिसांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांची परेड घेण्यात आली. पोलीस निरीक्षक पवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी नागरिकांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भोजने, पोलीस स्टेशनमधील कर्मचारी, जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थांनचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड, गावातील माजी पोलीस पाटील, ग्रामसेवक, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!