इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
महसूल व वनविभाग, महाराष्ट्र शासन 30 जुलै- 2021 च्या शासन निर्णयान्वये ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्य भर राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्या निर्णयानुसार सन 2022 खरीप हंगामाची ई- पिकपाहणी 2 ऑगस्टपासुन शेतकऱ्यांनी स्वतः गाव नमुना नंबर 12 ( सातबारा ) मध्ये पेरणी / लागवड झालेल्या पिकांच्या नोंदी भ्रमणध्वनी वरील ई-पीक पाहणी अँपद्वारे करावयाच्या आहेत.शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्याकरीता नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या गावी भेट दिली. जिल्हाधिकारी यांनी ई-पिक पाहणी करणेबाबत स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्याकरीता स्वत: शेतामधील पिकांची पाहणी करुन मोबाईलवर ई-पीक पाहणी अँपव्दारे पिकाची नोंद करुन दाखविली.
जिल्हाधिकारी यांनी इगतपुरी मधील शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी या अँपव्दारेस्वत: पिकपाहणी नोंदवावी व प्रशासनामार्फत् आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील 100% पिक पाहणी ही ई-पिक पाहणी अँपव्दारे नोंदवतील. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी, इगतपुरी – त्र्यंबकेश्वर उपविभाग तेजस चव्हाण, तहसिलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
,