साकुर सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनकर सहाणे, उपाध्यक्षपदी द्रौपदाबाई सहाणे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या साकुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर सुरेशराव सहाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हॉइस चेअरमनपदी द्रोपदाबाई वामन सहाणे यांचीही बिनविरोध वर्णी लागली. निवडीच्या बैठकीप्रसंगी संचालक विष्णुपंत सहाणे, भिमराज सहाणे, भारत सहाणे, खंडेराव कुकडे, रावसाहेब सहाणे, जगनराव सहाणे, तुकाराम सहाणे, सुरेश रणसुरे, त्र्यंबक आवारी, मुक्ताबाई घाडगे, किशोर सहाणे, नंदु सहाणे उपस्थित होते.

माजी सभापती आनंदराव सहाणे, माजी चेअरमन जगनराव सहाणे, माजी चेअरमन विष्णुपंत सहाणे, सरपंच विनोद आवारी, माजी चेअरमन मधुकर सहाणे, समाधान सहाणे, कचरू सहाणे, भानुदास कुकडे, शंकर सहाणे, बहीरू सहाणे, त्र्यंबक सहाणे, शिवाजी विठोबा सहाणे, माजी सरपंच सुनील सहाणे, भाऊसाहेब सहाणे, कचरू बाबा सहाणे, केरू नाना सहाणे, बाळू शेळके, शांताराम आवारी, भरत आवारी आदी मान्यवर हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय शिंदे यांनी काम पाहिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!