प्रेमविवाह झालेला युवक गोंदे येथून आठवड्यापासून बेपत्ता ; मुलीकडील व्यक्तींनी घातपात केल्याचा संशय : युवकाचा शोध लावण्यासाठी स्थानिक शाखेकडे तपास वर्ग करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

गोंदे दुमाला येथील कंपनीत काम करणारा एक युवक बेपत्ता झाला आहे. कामाच्या परिसरात युवकाची मोटारसायकल सापडली असली अद्यापही युवकाचा तपास लागलेला नाही. काही महिन्यांपूर्वी ह्या युवकाचा प्रेमविवाह झालेला आहे. म्हणून मुलीच्या नातेवाइकांनी अपहरण करून अथवा सुपारी देऊन ह्या युवकाचा घातपात केल्याचा संशय नितीनच्या नातेवाईकांना आहे. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात २४ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी काहीही प्रगती होत नसल्याने हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन संबंधितांना जेरबंद करावे, युवकाचा शोध करावा अशी मागणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. साहेबराव शंकर कोकणे रा. पारदेवी यांनी हे निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद आहे की, इगतपुरी तालुक्यातील पारदेवी येथील युवक नितीन मधुकर कोकणे हा नेहमीप्रमाणे गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत कामाला गेला. तो घरी परतला नसल्याने रात्री संपर्क झाला नाही. नातेवाईकांकडे चौकशी करूनही तपास लागला नसल्याने नातेवाईकांनी मंगळवारी २४ मे रोजी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नितीन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. बेपत्ता नितीन ह्याने फेब्रुवारी महिन्यात प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाला भावली येथील मुलीचे वडील, मामा वगैरे लोकांचा विरोध होता. यांनी नितीनला जीवे मारण्याची धमकी दिल्याने २९ मार्चला इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. नितीनला त्याच्या पत्नीकडून एप्रिल महिन्यात आलेल्या नोटिशीला नितीनने उत्तरही दिले होते. नितीनचे अपहरण करुन घातपात झाला असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी काहीही प्रगती होत नसल्याने हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन संबंधितांना जेरबंद करावे, युवकाचा शोध करावा अशी मागणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!