कळसुबाई मित्रमंडळाकडून त्रिंगलवाडी किल्ल्यावर सम्राट अशोका जयंती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

महान अशोक सम्राटांची जयंती घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी त्रिंगलवाडी किल्ल्यावर साजरी करून या महान सम्राटास विनम्र अभिवादन करण्यात आले. कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सम्राट अशोक यांचा जन्म  इ. पू. ४ मार्च 302 रोजी झाला. या सम्राटानी अखंड भारतावर म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ पर्यंत असलेल्या भूभागावर एकछत्री  राज्य केले होते. सम्राट अशोक यांचे राजचिन्ह तिरंगा ध्वज़ावर असून त्यांचे राजचिन्ह “चारमुखी सिंह” आजही भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे  त्यांचे वचन “सत्यमेव जयते” आजही आपले राष्ट्रीय वचन आहे. सेनेचा सर्वात युद्ध सन्मान “अशोक चक्र” सम्राट अशोक यांच्या नावाने दिले जाते. त्यांच्या राज्यात नालंदा, तक्षशिला, कंधार, विक्रमशिला इत्यादी २३ विश्वविद्यालय स्थापित केले होते. महामार्ग बांधले, जनावरांना मारण्यावर बंधने होती. यांच्या शासन काळात भारत विश्वगुरु होता. जनता सुखात भेदभाव न करता जीवन जगत होती. या जयंती उत्सवात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, अभिजित कुलकर्णी, बाळासाहेब आरोटे, गणेश काळे, अशोक हेमके, काळू भोर, प्रवीण भटाटे, डॉ. महेंद्र आडोळे, नितीन भागवत, संतोष म्हसणे, सुरेश चव्हाण, गोकुळ चव्हाण, सोमनाथ भगत आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!