इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ होते. गांधी यांच्या प्रतिमेस भास्कर गुंजाळ व खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन बाळासाहेब वालझाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना गुंजाळ यांनी सांगितले की गांधींना मारण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. मात्र गांधीजी त्यांच्या विचारांमुळे प्रत्येकाच्या मनात घर करून असल्याने ते कधीही मरणार नाहीत. त्यांच्या विचारांवर आज अनेक तरुण इतिहास घडवत आहेत तसेच “व्हाय किल्ड गांधी” या चित्रपटात असुरी शक्तींचे उदात्तीकरण होत असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी असेही गुंजाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी माजी उपसभापती विष्णु चव्हाण, घोटी ग्रामपालिकेचे माजी सरपंच बाबुराव भोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नारायण जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत किर्वे, शिवराम गिते, अरूण गतीर, सुरेश राजापुरे, पंढरी बोराडे, भिका शिंदे, दीपक वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते