धोका वाढला ; इगतपुरी तालुक्यात आज नवीन 52 कोरोना पॉझिटिव्ह

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. इगतपुरी तालुक्यात आज नवीन 52 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत 250 पेक्षा जास्त कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून गावोगावी प्रशासनाने निर्बंध कठोर करावेत अशी नागरिकांची मागणी आहे.