इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात १०१ ठिकाणी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांसाठी देणार सुसज्ज ग्रंथालय : माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद सदस्या नयना गावित यांची संकल्पना

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि महिलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित सरसावल्या आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील १०१ ठिकाणी सुसज्ज वाचनालय असावे अशी ह्यामागची मूळ संकल्पना आहे. ह्या संकल्पनेनुसार १०१ ठिकाणी सर्व प्रकारच्या पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्च्या आदी साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गावकऱ्यांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी इच्छुक नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी आमदार निर्मला गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांनी १०१ वाचनालये ह्या संकल्पनेबाबत अधिक माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अनेक संदर्भ असणाऱ्या पुस्तकांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. यासाठी होणारा खर्च आणि सुविधा गावांमध्ये नसते. यासह वयोवृद्ध नागरिकांना मनोरंजन करण्यासाठी अनेक पुस्तके हवी असतात. महिला आणि मुलींनाही विविध विषयांवरील पुस्तके हवी असतात. मात्र आपल्या आपल्या गावात पुस्तके मिळणे अवघड असते. ह्या पार्श्वभूमीवर १०१ ठिकाणी आवश्यक आणि उपयुक्त पुस्तकांनी सुसज्ज असे छोटेसे वाचनालय निर्मित करण्यात येणार आहे. यासाठी असंख्य पुस्तकांनी भरलेले कपाट, टेबल, खुर्च्या दिल्या जाणार आहेत. वाचनालये सुद्धा ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात. ही योजना राबविण्यासाठी गावातील पदाधिकारी अथवा इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारी घेतली पाहिजे एवढीच नाममात्र अपेक्षा आहे. जो लवकर संपर्क करतील त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत इच्छुक असणाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित 7387127111, रमेश आचारी 7776955063, हरसूल त्र्यंबकेश्वर भागासाठी रमेश भोये 78208 99390 यांना आठ दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा पुस्तके, विज्ञानविषयक गोष्टी, प्रेरणादायी विचार, कथा-कादंबऱ्या अशा विविध विषयांची पुस्तके वाचली जावी, अशी मूळ संकल्पना आहे. यासाठी ग्रंथपाल म्हणून गावातील स्वयंसेवक नियुक्त करावे लागतील. या संकल्पनेतून विविध विषयांची पुस्तके दिली जातील. नागरिकांनी ह्याचा लाभ घेण्यासाठी अवश्य संपर्क साधावा.

- निर्मला गावित, माजी आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!