महामार्गावरील कच आणि धुळीमुळे मोटारसायकली घसरून अपघाताचे प्रमाण वाढले : दोन वेगवेगळ्या अपघातात २ युवक आणि १ महिला गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

मुंबई आग्रा महामार्गावर आज दोन वेगवेगळे मोटारसायकल अपघात झाले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने दोन्ही अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असल्याने रस्त्यावर कच पसरली आहे. ह्यामुळे प्रचंड धुळीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. ह्या कचमुळे मोटारसायकली घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी याकडे गंभीरपणे पाहावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

पहिला अपघात दुपारी 12 च्या दरम्यान नाशिककडून मुंबईकडे जातांना थायसन कृप कंपनीजवळ झाला. अभिजीत चक्रवर्ती सध्या रा. आनंदवन गोंदे दुमाला यांची मोटारसायकल क्रमांक CG 04 D 377 घसरल्याने अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील राजूर फाट्याजवळ गांधी पेट्रोल पंपाच्या आसपास झाला. दुपारी पावणेदोन वाजता छाया गौतम नेटावटे यांची मोटारसायकल घसरून खड्ड्यात जाऊन आदळली. ह्या अपघातात छाया गौतम नेटावटे वय ४५ ह्या गंभीर जखमी तर समीर गौतम नेटावटे वय १९ हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील यांनी त्यांना नाशिकच्या सुदर्शन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!