घोटी पोलिसांची कामगिरी ; गोमांस वाहतूक करणाऱ्यांकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
घोटी सिन्नर फाट्यावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गस्त सुरू होती. यावेळी संगमनेरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाच्या हालचाली संशयास्पद असल्याने घोटी पोलीसांनी चालकाला हटकले. चालक उलटसुलट उत्तरे देत असल्याने पोलीसांचा संशय बळावला. पोलीसांनी पिकअपची झडती घेतली असता विना परवाना गोमांसाची चोरटी वाहतुक करतांना आढळुन आले. याबाबत पोलीसांनी कारवाई करीत पिकअप वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घोटी सिन्नर मार्गावरील घोटी फाट्यावर पोलीसांची गस्त सुरु होती. यावेळी संगमनेरच्या दिशेने येऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची पिकअप क्रं. एम. एच. 04 एच. डी. 5668 गाडीचा संशय आल्याने पोलीसांनी गाडी थांबवुन चौकशी केली.  चालकाने उलट सुलट उत्तर दिल्याने वाहनाची झडती घेतली असता गाडीत विना परवाना गोमांसाचे तुकडे आढळुन आले. पशु वैद्यकीय अधिकारी यांचे जनावर कत्तल करण्याचे प्रमाणपत्र अगर गोमांस वाहतुक करण्याचा कोणताही परवाना आढळुन न आल्याने बेकायदा गोमासांची वाहतुक करणारी ४ लाख किमतीची पिकअप व १ लाख ५० हजार किमतीचे दिड हजार किलो गोमांस पोलीसांनी जप्त केले. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात पोलिस नाईक शितलकुमार गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात अब्दुल मतीन ईमानुल्लाह शहा, वय ३५ वर्ष, रा. गोवंडी बैंगनवाडी, शिवाजी नगर डपींगरोड मुंबई, ऐसान लोधे कुरेशी, वय २८ वर्ष, रा. नेहरू नगर, बर्माशिल रेल्वेलाईन, कुर्ला, मुंबई, कमर अली गुलाम कुरेशी, रा. भारत नगर, संगमनेर, वसीम कुरेशी, रा. मुंबई पुर्ण नाव माहित नाही यांच्यावर महाराष्ट्र पशु संवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे करीत आहे.

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!