इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
मुंबई आग्रा महामार्गावरील अपघातांचे सत्र कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आठवड्यापासून कुठे ना कुठे अपघात होतच आहेत. महामार्गावर आज २ अपघात झाले. पहिला अपघात आज रात्री 8 वाजेच्या सुमाराला नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला. पाडळी देशमुख फाट्याजवळ विठ्ठल कामत हॉटेलच्या समोरून पायी चालणाऱ्या महिलेला मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात पादचारी महिला आणि मोटारसायकल चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी तातडीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती दिली. त्यानुसार रुग्णवाहिका समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल झाली. गंभीर जखमी मोटारसायकल चालक प्रकाश पांडू पारधी वय 25 रा. शेणवड बुद्रुक, पादचारी महिला नंदाबाई दामू पगारे वय 30 रा. कावनई ह्या गंभीर जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या एका अपघातात वाडीवऱ्हेजवळ नरेंद्र मधुकर सूर्यवंशी रा. पाथर्डी वय 32 यांच्या मोटारसायकलला MH 46 X 1876 ह्या भरधाव कारने धडक दिली. कारचालक पळून गेला. यामध्ये एकजण जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.