इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 ( समाधान कडवे, वैतरणानगर )
त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दोन्ही तालुक्यात विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोविड सेंटरची पाहणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चर्चा केली. त्यानुसार अवलंबवयाच्या उपाययोजना संदर्भात विविध उपयुक्त सुचनाही केल्या.
उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण हे नुकतेच कोरोना आजारातून बरे झाले आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याची महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण कोविड सेंटरला भेटी देत आहेत. त्यांच्याकडून भेट दिलेल्या ठिकाणी पाहणी करून महत्वाच्या सुचना दिल्या जात आहेत. भेटीवेळी त्यांनी आढावा घेत विविध उपाययोजना संदर्भात नियोजन केले. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेची माहिती घेवून उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्या. कोविड सेंटरमधील रुग्णांची भेट घेवुन आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरपालिका कर्मचारी, नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.