इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला परिसरात एकाचवेळी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात ४ जण गंभीर झाले आहेत. जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांच्या सतर्कतेने चौघा जखमींना उपचारासाठी नाशिकला दाखल करण्यात आले आहे. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव बचावला आहे.
पहिला अपघात गोंदे दुमाला गावातील मुख्य रस्त्यावर झाला. आज रात्री साडेआठच्या सुमाराला दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये सुरेश शाहु वय 30, अशोक रज्जाक वय 25 सध्या राहणार गोंदे दुमाला हे गंभीर जखमी झाले. यासह दुसरी मोटारसायकल क्रमांक MH 15 DW 9980 ह्या मोटार सायकलीवरील शुभम रामचंद्र बोराडे वय 23 रा. गोंदे दुमाला हा युवक गंभीर जखमी झाला. याबाबत जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना समजताच त्यांनी जखमींना तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुभम बोराडे यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या अपघातातील जखमींना रुग्णालयात नेत असतांना काही अंतरावरील व्हिटीसी फाट्याजवळ मोटरसायलीचा दुसरा अपघात झाला. MH 15 EZ 1184 ही मोटारसायकल चालवणारे प्रवीण बापु अहिरे वय 35 रा. मल्हार खान नासिक यांनी समोरच्या वाहनाला धडकवले. यामध्ये ते स्वतःच गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमींना एकाच रुग्णवाहिकेतून नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेत उपचार मिळाल्याने जखमींचा बहुमोल प्राण बचावला.