नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या सभासदांसाठी सुरक्षा कवच मर्यादा रुपये चार लक्ष – मधुकर आढाव

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या पतसंस्थेची  ४थी वार्षिक सर्वसाधारण सभा गुगुल मिटद्वारे ऑनलाइन पद्धतीने पतसंस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांचे अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या कार्यालयातून संस्थेचे व्हॉईस चेअरमन श्रीकांत अहिरे, सचिव तुषार पगारे, संचालक जी.पी.खैरनार, फैय्याज खान, विजय देवरे, विजय सोपे, जयवंत सूर्यवंशी, जयंत सोनवणे, प्रशांत रोकडे, संजय पगार, गोरक्षनाथ लोहकरे, सुनिल जगताप, सुलोचना भामरे व सोनाली तुसे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
कोरोना साथरोग पार्श्वभूमीवर सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या सन २०१९-२० च्या वार्षिक नफा वाटणी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार कार्यरत संचालक मंडळाला प्रदान करण्यात आलेले होते. परंतु संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांना ३१ मार्च, २०२१ अखेर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करुन कार्योत्तर मान्यता घेण्याचे नमूद केले होते. त्यानुसार  पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची नफा वाटणीस कार्योत्तर मान्यता देणे, पतसंस्थेस ३१मार्च,२०२० अखेर कमी जास्त झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे, पतसंस्थेच्या सन २०२०-२१च्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, पतसंस्थेच्या सभासदांच्या सुरक्षा विमा कवच योजनेची व्याप्ती रुपये २लक्ष वरुन ४ लक्ष करणे, सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणे व पतसंस्थेच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखा परीक्षणाचे वाचन करुन लेखा परीक्षण अहवालास  मान्यता देणे आदी विषयांची ऑनलाइन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवुन सखोल चर्चा करुन एकमुखाने कार्योत्तर मान्यता दिली.
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या पतसंस्थेने संगणकीय युगात बँकिंग व्यवहार सहज सुलभ व्हावा यासाठी फोन पे सुविधा कार्यान्वित करण्याचा निर्णय, संस्थेच्या स्वमालकीच्या इमारत खरेदी करण्याचा निर्णय व थोड्याच अवधीत सभासदांसाठी रुपये सहा लक्ष कर्ज मर्यादा केल्याबद्दल कार्यरत संचालक मंडळाचे अभिनंदनाचा एकमुखी ठराव सभेस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित सभासदांनी मांडून त्यास एकमुखाने अनुमोदन देण्यात आले.                                                                               नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची स्थापना दिनांक ६ मे,२०१६ रोजी करण्यात आलेली होती. जिल्हा परिषद स्तरावर ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनी यांना आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांनी या पतसंस्थेची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत पतसंस्थेचे ८४८ सभासद असुन खेळते भाग भांडवल रुपये चार कोटी पर्यंत झाले आहे. पतसंस्थेचे मासिक वर्गणी व कर्ज हप्ता हा संगणकीय ऑनलाइन प्रणालीद्वारे पतसंस्थेस जमा केले जात असून, कर्ज वितरण नेट बैंकिंग प्रणालीद्वारे कर्जदार सभासदाच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदास कर्ज मागणी केल्यास, तात्काळ कर्ज उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेने थोड्याच अवधित कर्ज मर्यादा रुपये तीन पाच लक्ष वरुन रुपये सहा लक्ष मर्यादेपर्यंत नेली, त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळ व सभासद यांनी सभेत चर्चा करुन पतसंस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासद मासिक वर्गणी व कर्ज वसुली बाबत वेळेत पतसंस्थेस भरना करनेबाबात केलेल्या पाठपुराव्यामुळे पतसंस्था कर्ज मर्यादेत वाढ करु शकत असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा आरोग्य कर्मचारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे चेअरमन मधुकर आढाव यांनी केले आहे. नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे संचालक अनुक्रमे मोठाभाऊ ठाकरे व दिपक अहिरे यांचेसह सेवानिवृत्त जेष्ठ सभासद सुभाष कंकरेज, संजय संवत्सरकर, बाळासाहेब चौधरी, अमृत खैरनार, संतोष खालकर, अनिल धोंडगे, राजेश निकुंभ, शिरीन मांडे, अनिल राठी, जयमाला सुतार,जगन्नाथ जमधडे, हेमंत साळुंके, कैलास देवरे, एकनाथ वाणी, दिनेश ठाकरे, विजय चौधरी, महेंद्र गांगुर्डे,  किरण पवार, दिनेश कुलकर्णी, प्रशांत भदाने, मंगला खैरनार, विनया महाजन, नलु खरक, छाया चौधरी, निलेश नंदन, प्रशांत सोनवणे यांनी सभेतील चर्चेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला. सभेचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांनी केले तर अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक रामदास वडनेरे यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे सचिव तुषार पगारे यांनी मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!