
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथील गवारी ह्या आदिवासी कुटुंबात नैसर्गिक आपत्तीमुळे घर पडून पती आणि पत्नीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. याबाबत माहिती समजताच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली. ह्या दुर्दैवी घटनेत सुदैवाने गवारी कुटुंबातील 4 जण बचावले. याप्रकरणी नाशिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या निरीक्षक स्मिता आगवने यांच्याशी संपर्क साधून दुर्दैवी कुटुंबाला तातडीने शासकीय अर्थसहाय्य देण्याच्या सूचना केल्या. ह्या आदिवासी कुटुंबातील बचावलेल्या व्यक्तींवर योग्य ते वैद्यकीय उपचार करावेत, विनाविलंब शासकीय मदत आणि नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्या लकी जाधव यांनी यावेळी केल्या. गवारी परिवाराला दिलासा देऊन आदिवासी विकास परिषद पाठीशी असल्याची ग्वाही लकी जाधव यांनी दिली.
यावेळी वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे , ग्रामसेवक श्री. पगार सर, तलाठी यांच्याशी मुलांचे शिक्षण, नैसर्गिक आपत्ती मदत, आदिवासी विभागातून मदत मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनीही दखल घेतली असल्याची माहिती लकी जाधव यांनी दिली. केए ग्रुपचे अध्यक्ष आदिवासी गायक संदीप गवारी, लक्ष्मण खराटे, गंगाराम तळपाडे, सोमनाथ खोटरे, निशांत चंद्रमोरे, पदाधिकारी आणि गावकरी यावेळी हजर होते.