रायांबे उपसरपंचपदी कलावती धांडे बिनविरोध

किरण रायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

रायांबे ता. इगतपुरी येथील ग्रामपंचतीच्या उपसरपंचपदी कलावती कैलास धांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिवसेना उपतालुका रमेश धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा पिगळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीची बैठक पार पडली.

मावळत्या उपसरपंच अलका भोर यांनी त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या आदेशानुसार उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सभेप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई शिंदे, गोटीराम दिवटे, पंजाबाई दिवटे, कलावती धांडे, जितेंद्र दोंदे, गोकुळ भोर, शिवाजी धांडे, नामदेव धांडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणार : कलावती धांडे

रायांबे ग्रामपंचायतीच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष देऊन सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन नूतन उपसरपंच कलावती धांडे यांनी सत्काराला उत्तर देताना दिले. ग्रामसेवक शरद रहाडे यांनी सभेचे कामकाज पाहिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!