शिवसंपर्क अभियान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चरणी अनोखी भेट : खंडेराव शिवराम झनकर यांच्याकडून स्वखर्चाने रुग्णवाहिका

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

कोरोना महामारी आणि इतर अनेक कारणांमुळे इगतपुरी तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळवण्यासाठी रुग्णवाहिकेचा मोठा अडसर ठरतो. ह्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व कट्टर शिवसैनिक साहेबराव झनकर यांच्या प्रेरणेने खंडेराव शिवराम झनकर यांनी इगतपुरी तालुक्याला स्वखर्चाने रुग्णवाहिका लोकार्पण केली. इगतपुरी तालुक्यात खेड जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियानात खंडेराव झनकर यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चरणी रुग्णवाहिकेची भेट समर्पित करीत असून रुग्णसेवेसाठी मदतीसाठी कायम तत्पर राहील असे खंडेराव शिवराम झनकर यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, जिल्हा परिषद सदस्य सदस्य हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे आदींसह खेड गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णवाहिका अर्पण करतांना जेष्ठ शिवसैनिक स्व. नामदेव पाटील गाढवे यांची शिवसैनिकांना आठवण यावेळी आठवण झाली.

इगतपुरी तालुक्यात दुर्गम अतिदुर्गम आदिवासी भागात कोरोनामुळे जनजीवन अतिशय विस्कळीत झालेले आहे. यासह अचानक उदभवणाऱ्या आजारांमुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तातडीने आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र सुसज्ज रुग्णवाहिका नसल्याने त्यामध्ये रुग्णांना जीव सुद्धा गमवावा लागतो. ह्या पार्श्वभूमीवर खंडेराव शिवराम झनकर यांनी स्वतः पदरमोड करून रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी दिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी त्यांचे कौतुक केले.

जनसेवा हीच ईश्वरसेवा असे ब्रीद घेऊन मी नेहमीच काम करीत आलो आहे. आपल्या तालुक्यातील नागरिकांचा जीव वाचवण्याला उपयोगी असणारी रुग्णवाहिका शिवसंपर्क अभियानात लोकांच्या सेवेत दाखल केली. जेष्ठ शिवसैनिक स्व. नामदेव पाटील गाढवे यांनी दाखवलेल्या सेवेच्या मार्गाने काम करीत आहोत. लोकांना अधिकधिक चांगले देण्याचा मी वसा घेतलेला आहे.
- खंडेराव शिवराम झनकर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!