
इगतपुरीनामा न्यूज : चिंतामणी बहुउद्देशीय संस्था संचलित स्नेहबंध वधू वर सूचक मंडळाच्या वतीने नाभिक समाजातील इच्छुक वधू वरांसाठी राज्यस्तरीय नाभिक समाज वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी गंगापूर रोडलगतच्या श्री चिंतामणी मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हा मेळावा होईल. श्री चिंतामणी मंगल कार्यालय येथे प्रवेश अर्ज उपलब्ध असून इच्छुकांनी प्रवेश अर्जासह अधिक माहितीसाठी भाऊसाहेब आंबेकर ९७६५५५९६३९, शंकरराव आहेर ९५६१०९१७११ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत. लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा असतात. मात्र त्या पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते. बाह्यरुपाला महत्त्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळून उत्तम संसार होणे शक्य असते. आम्ही मेळावा आयोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून त्याचा परिणाम म्हणून समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्यात अनेक ऋणानुबंध जुळतील असा विश्वास अध्यक्ष भाऊसाहेब आंबेकर यांनी व्यक्त केला. दरवर्षी ह्या मेळाव्याला वाढता प्रतिसाद आहे. वधू वरांना त्यांच्या शिक्षण, वय, आवड निवड यानुसार पसंती करता यावी, हे लक्षात घेऊन वधू वर सूची पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. त्यातून अनेक विवाह जुळतात. इच्छुकांनी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.