बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी

बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी या विषयावर अनुभवसिद्ध मार्गदर्शन..!

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

नोकरीच्या संधी आणि सध्याची परिस्थिती
आज संपूर्ण जगामध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव, जागतिक महामंदी, विस्कळीत झालेली व ढासळत असलेली अर्थव्यवस्था यामुळे असंख्य रोजगार कमी होत आहेत. लाखो बेरोजगारांची भर नित्यनेमाने पडत आहे. रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी आता संपत चालल्या आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी बँकिंग व वित्तिय क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आदी काही क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. पात्र व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधरांनी या संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे.

■ बँक ऑफ बडोदा मधील संधी
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या ५१७ जागा Contract Basis वर भरावयाच्या असून पात्र उमेदवारांनी या संधीचा वित्तिय क्षेत्रातील प्रवेशासाठ , करिअरसाठी उपयोग करून घ्यावा. ही पदे व जागा पुढीलप्रमाणे ०१. सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर ( ४०७ जागा ), ०२. ई- वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( ५० जागा ), ०३. टेरिटरीहेड ( ५० जागा ), ०४. ग्रुप हेड ( ६ जागा ), ०५. प्रॉडक्ट हेड ( इन्व्हेस्टमेंट  अँड रिसर्च ) ( १ जागा ), ०६. हेड ऑपरेशन अँड टेक्नॉलॉजी ( १ जागा ), ०७. डिजिटल सेल्स मॅनेजर ( १ जागा ), ०८. आयटी फ्न्कशनल अनलिस्ट मॅनेजर IT Functional  Analyst Manager  ( १ जागा )

■ अंतिम मुदत
यासाठी ऑनलाईन अर्ज, रजिस्ट्रेशन आणि फी पाठविण्याची शेवटची मुदत ही २९ एप्रिल २०२१ असून अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी www.bankofbaroda.co.in/careers.htm या संकेतस्थळावर उमेदवारांनी भेट द्यावी अथवा उपयोग करावा.

■ आरक्षण व इतर माहिती
०१. वरील सर्व पदांसाठी SC, ST, OBC, EWS, UR, Person With Disability या सर्व प्रवर्गांसाठी आरक्षण असून त्याचीही माहिती वरील संकेतस्थळावर दिलेली आहे. ०२. मुंबईसह भारतात वेगवेगळ्या ठिकाणी निवड झाल्यावर नोकरीसाठी च्या जागांची माहिती देखील बँकेच्या वरील संकेतस्थळावर दिलेली आहे. ०३. Contract Basis वर या जागा भरावयाच्या आहेत.

अर्ज करणे व भरती प्रक्रिया
०१. या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम सांगितलेल्या नियमाप्रमाणे उमेदवाराने बिनचूक व वेळेत ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे. ०२. दिलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर आवश्यक त्या प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करुन ठेवणे आवश्यक आहे. ०३. मुलाखत, समूह चर्चा ( Group  Discussions ), स्थानिक भाषेचे ज्ञान, परीक्षेची तयारी, आयटीचे ज्ञान या गोष्टींची तयारी करून ठेवणे. एवढेच नव्हे तर यात आपण सर्वात पुढे कसे राहू याची तयारी केल्यास बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील अनेक संधी आपण मिळवू शकतो हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. उमेदवारांनी अर्ज करतांना व इतर माहितीसाठी लेखात दिलेल्या संकेतस्थळावरील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. सविस्तर सर्व प्रकारची माहिती त्यावर दिलेली आहे हे लक्षात घ्या.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    बेरोजगाराना नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी लेख आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    अशा प्रकारची जाहिरात सहजासहजी उपलब्ध होत नाही…जसे.. जाहिरात दिसते तर जागा किती ,पात्रता काय, पदे किती या बद्दल सर्व माहिती दिली आहे..

Leave a Reply

error: Content is protected !!