गोंदे दुमाला येथील १२ वर्षीय मुलगा नांदगाव बुद्रुकजवळ बुडाला : शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणावर कपडे धुण्यासाठी परिवारासह गेलेला १२ वर्षीय बालक पाण्यात बुडाला आहे. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमाराला घडली. गोंदे दुमाला येथील राहणारे हे बालक असल्याचे समजते. मुकणे धरणातून पाण्याचे आवर्तन सुरु असल्याने पाण्याची गती वेगवान असून बुडालेल्या बालकाचा शोध लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. गोंदे दुमाला परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. ह्या गावकऱ्यांनीही मदतकार्य सुरु केले आहे. धुणे धुवत असतांना हे बालक खेळत होते. अचानक ते बुडाले असल्याचे समाजताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही बालकाचा शोध लागलेला नाही. ( सविस्तर बातमी लवकरच )

Similar Posts

error: Content is protected !!