लोकांच्या मनामनात अबाधित स्थान असणारे “सरपंच” नारायण राजेभोसले : स्वराज्यप्रमुखांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र व्यक्तिमत्व

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – इगतपुरी तालुक्यातील धामणीचे भूमिपुत्र नारायण राजेभोसले बालपणापासूनच सरपंच म्हणून सुपरिचित आहेत. स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्यावर इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. सर्वांना आपलेसे, योग्य दिशा दाखविणारे आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नारायण राजेभोसले यांनी वेगवेगळ्या कामांनी समाजाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. समाजातील उत्तम कामगिरी पाहून  स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांना स्वराज्य संघटनेच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक म्हणून नारायण राजेभोसले ओळखले जातात. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बळीराजाच्या हितासाठी ते कायम आघाडीवर असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य व्यासपीठावर प्रखरतेने मांडून प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असतो. समाजाला एकत्र करून लग्नादी अनाठायी खर्चांबाबत त्यांची जनजागृती प्रसिद्ध आहे.बालपणापासून गणेशोत्सव, शिवजयंती मंडळांचे नेतृत्व करून आकर्षक नियोजन करण्यात ते अग्रेसर आहेत.

धामणीच्या उपसरपंचपदावर त्यांच्या सौभाग्यवती विराजमान आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भरवलेले इगतपुरी तालुक्यातील अव्वल असणारे डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन कौतुकाला पात्र ठरले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सक्षम आणि योग्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना गोरगरिबांना आर्थिक मदत, अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यात ते सदैव पुढे असतात. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कामात गौतम भोसले, भाऊसाहेब भोसले, ज्ञानेश्वर शिवाजी भोसले, ईश्वर भोसले, बहिरू भोसले, राजू भोसले, शरद भोसले, नितीन भोसले आदींचे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केल्यास नागरिक आनंदी होतात. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता आपले काम करीत राहणे गरजेचे आहे. आपलेच चांगले काम आपल्याला नवीन चांगले काम करण्याची ऊर्जा देत असते. समाजासाठी अधिकाधिक गतिमान काम करण्यासाठी कृतिशील राहणार आहे. यासह स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लोकांसाठी सदैव कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया स्वराज्यचे तालुकाध्यक्ष नारायण राजेभोसले यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!