जिंदाल अग्नीतांडव – बेपत्ता कामगाराबाबत करा “येथे” संपर्क

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीत रविवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास कंपनीचॅ्क पॉली प्रोडक्शन युनिटमध्ये विस्फोट होऊन आग लागली आहे. ज्याठिकाणी आग लागली त्या भागामधुन बचाव पथकामार्फत आतापर्यंत अडकलेल्या एकुण 19 व्यक्तींना बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यांना तात्काळ वैद्यकिय सुविधा पुरविण्याकरीता सुयश हॉस्पिटल नाशिक व ट्रोमा केअर सेंटर नाशिक येथे हलवण्यात आले आहे. जखमींपैकी 2 महिला मयत झाल्या असुन 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत. जिंदाल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीत काम करणारे जे कर्मचारी नमुद घटनेदरम्यान कंपनीमध्ये उपस्थित होते परंतु त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क होत नाही अशा बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ बेपत्ता कर्मचारी यांच्या तपशिलासहीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत तहसिल कार्यालय इगतपुरी क्रमांक 02553-244009, तेजस चव्हाण, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग, नाशिक क्रमांक 8108851212, परमेश्वर कासुळे, तहसिलदार इगतपुरी संपर्क क्रमांक 9604075535, प्रविण गोंडाळे, निवासी नायब तहसिलदार क्रमांक 9850440760, नितीन केंगले, महसुल सहाय्यक क्रमांक 9767900769 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार इगतपुरी यांनी कळवले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!