रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून शिक्षकांचा नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24

नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य,विद्यार्थी हितासाठी चाकोरी बाहेर जाऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या ज्ञानदूत शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून सन्मानित करण्यात आले. यामध्ये 37 वर्ष शैक्षणिक कार्य करणारे केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेश खैरनार, अमोल बावा, दिलीप सोनवणे, योगिता हाके, सरला बच्छाव, सुशीला चोथवे, निर्मला वाघ, वर्षा निकुंभ, ज्ञानेश्वर कोकणे, प्रमिला जाधव, सोपान भोईर, योगेश गाढवे, कविता साठे, हर्षदा  बागुल, नीलिमा पाटील, निवृत्ती कमोदकर यांना नेशन बिल्डर पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.

यावेळी कविता साठे, प्रमिला जाधव, श्रीराम आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबच्या आशा वेणूगोपाल, अध्यक्ष नंदकिशोर कारवा, सचिव रेणू पानीकर, राजेंद्र पाटणकर, जयंत खैरनार, अनिल देशमुख, राजन पिल्ले, अंजली मेहता, जगदीश गिलडा, माला कापडिया, अरविंद पांचाल, दीपिका मेहरा, मीना जैन, विवेक सायखेडकर, भैय्यासाहेब कोठावले, चंद्रलेखा कोठावले यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्वाती साठे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!