इगतपुरी तालुक्यात आज 36 कोरोना बाधितांची भर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 13
आज मराठी नववर्ष दिन गुढीपाडव्याच्या दिवशी इगतपुरी तालुक्यात 36 नव्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 322 झाली आहे. गोंदे दुमाला येथे आज सुटीचा दिवस असूनही 150 नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले. बेलगाव कुऱ्हेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम बांबळे, डॉ. पाटील, सपकाळ नाना, राऊत नाना, आरोग्यसेविका प्रमिला मेदडे, आरोग्य सेवक राजाराम भोईर, मनीष झाझड, आशा गट प्रवर्तक विद्या जाधव, जयश्री आहेर, अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले. कोरोनापासून दूर राहण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाचे उच्चाटन करावे अशी  अपेक्षा व्यक्त होत आहे.
वैद्यकीय साधनांची कमतरता असतांनाही इगतपुरी तालुक्यातील आरोग्य विभाग युद्धपातळीवर कोरोनाचा लढा लढत आहे. ह्या लढ्यात नागरिकांकडून फक्त किमान अपेक्षा आहेत. नियमित हात धुणे, मास्क लावणे, गर्दीत सहभागी न होणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा त्या अपेक्षा आहेत.