इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
मुंबई आग्रा महामार्गांवर काही महिन्यापूर्वी डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतांनाच आज इगतपुरी तालुक्यात एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळला आहे. सापडलेला मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याचा उलगडा होणे बाकी आहे. ही घटना आज इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरात घडल्याचे आढळून आले. एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा याबाबत बद्दल अजून पर्यंत कोणताही तर्क लावण्यात आलेला नाही. रस्त्याच्या मध्येच हे वाहन जळालेल्या अवस्थेत सापडले असून वाहनात जळालेला मृतदेह आढळला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नासिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घोटी पोलीस ठाण्याचे पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरु करण्यात आली असून लवकरच घटनेचा ह्या उलगडा होईल असं सांगण्यात आल आहे. सर्व सोपस्कार आणि तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाने वेग घेतला आहे.