
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
साकुर येथील वारकरी तथा ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे यांचा जन्मदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीला येणाऱ्या जन्मदिनी त्यांनी पिंपळगाव डुकरा येथील आश्रमातील गतिमंद व्यक्तींच्या सहवासात जाऊन त्यांना फळे वाटप केली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारीत त्यांना फळांचा घास भरवला. गतिमंद व्यक्तींचे वेगळेच जग असते. त्यांच्याकडे कुणीही जात नाही. मात्र त्यांच्या सहवासात जाऊन आनंद टिपण्याचा प्रयत्न तुकाराम सहाणे यांनी केला. येथील आश्रमात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वयोगटातील गतिमंद व्यक्ती आहे. त्यांच्या अंगात अनेक कलाही अवगत आहे. त्याचेही कौतुक तुकाराम सहाणे यांनी यावेकी केले.
तुकाराम सहाणे दरवर्षी आपला जन्मदिन अनाथ आश्रमातील मुलांबरोबर अशाच वेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. कार्यक्रमाप्रसंगी भगवान सहाणे, समाधान सहाणे, शांताराम सहाणे, संजय सहाणे, सोपान सहाणे, दामू सहाणे, दत्तू सहाणे, दिनकर सहाणे, तुकाराम कुकडे, भरत सहाणे, भाऊराव रंधे, हरी सहाणे, शरद शिंगाडे, रवी बोराडे, विनोद बोराडे, अशोक भगत, योगेश वाकचौरे, सुरेश सहाणे, शांताराम कुंदे, प्रवीण कुंदे, नवनाथ झनकर, बाळासाहेब घाडगे आणि आधार आश्रमातील कर्मचारी उपस्थित होते