इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी शहरातील नगरपरिषद तलावाचे व तळेगांव येथील जीवन प्राधिकरण तलावाचे पाणी शहराला कमी पडत असल्यामुळे गेल्या ४ वर्षापुर्वी भावली धरणातुन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. गेल्या तीन वर्षापासुन या योजनेचे काम सुरु आहे. या पाईपलाईनसाठी जवळपास ३६ कोटी रुपये मंजुर होऊन काम प्रगतीपथावर असुन अद्यापपर्यंत नागरिकांच्या घरापर्यंत हे पाणी भावली धरणातुन इगतपुरी शहरापर्यंत पोहचण्याआधीच पिंप्रीसदो परिसरात ही पाईपलाईन फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे हे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. संबंधित ठेकेदाराने इगतपुरी शहरातही संपुर्ण प्लॅस्टीकचे पाईप वापरले असुन ही पाईपलाईन करतांना अगदी निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे नागरिक सांगतात. भविष्यात शहरातही मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन फुटण्याची शक्यता नाकारता येत नसुन निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
व्हिडीओ पहा