इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
आजकाल कॅन्सर खूप सामान्य झाला असून स्तनाचा कॅन्सर दिवसेंदिवस वाढत आहे. हा कॅन्सर खूप प्रगतीशील अवस्थेत समजत असल्याने जीव वाचवणे कठीण होऊन बसते. स्तनांचा कर्करोग विशेषतः तीस ते चाळीस वयोगटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात होतो. निदानास उशीर झाल्याने स्तनाच्या स्तन कर्करोगाने झालेल्या मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे स्तनांच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येत नाही. म्हणून आजाराच्या सुरवातीलाच निदान झाले तर त्यावर योग्य उपचार करता येतात. प्रत्येक स्त्रीला स्तनांच्या कॅन्सर लक्षणांची माहिती असावी ह्या जागृतीच्या हेतूने करेज इंडिया कॅन्सर फाउंडेशनने स्तनाचा कर्करोग आयुर्वेद जनजागृती अभियान सुरू केले आहे. ह्यावर रविवार दि. २९ ला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्री शंकराचार्य कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व जागरुक महिला नागरिकांनी मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. प्रशांत जोशी यांनी केले आहे.
स्तनाचा कर्करोग जागृती व उपचार अभियान लोकांना कर्करोग, कर्करोगाचे कारण आदींबाबत जागृत करण्याच्या मुख्य उद्धेशाने सुरू करण्यात आले आहे. या अभियानामध्ये कर्करोगाच्या गुठळ्या, गाठी कशा ओळखाव्यात ? गाठी ओळखल्यावर त्यावर तातडीने करावयाची कारवाई व उपचार आणि शेवटी त्यावर घ्यावयाची योग्य आयुर्वेदिक औषधे व उपचार पद्धती यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
यामध्ये आयुर्वेद उपचार पद्धती व कर्करोग प्रतिबंधात्मक जीवनशैली यावर वैद्य जयंत गांगुर्डे व वैद्य किरण गांगुर्डे मोफत मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. प्रशांत जोशी आणि करेज इंडिया कॅन्सर फाउंडेशनने केले आहे.