इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील भाऊसाहेब गणपत राव यांच्या वाडीवऱ्हे येथील गट नंबर ४४६ अ/ ब ४ एकर शेतात ऊस कापून कारखान्यात पाठविण्यासाठी तयार होता. ट्रॅक्टर येण्याची वाट बघत असताना अचानक विजेच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन कापून ठेवलेला ऊस पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेमुळे ह्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठे नुकसान झाल्याने हे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
शेतकऱ्याचा याच पिकावर वर्षभराचा घरखर्च, मोटर लाईट बिल, शिक्षण, शेतीला लागणारी खते, बी बियाणे, रोपे यांची उसनवारी यातून येणाऱ्या पैशातूनच कसेबसे तडजोड करत प्रवास सुरू होता. परंतु ऊस आता जळून खाक झाल्याने पूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे. विद्युत कंपनीने या जळीत उसाची नुकसान भरपाई देवून या कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी गावकऱ्यांसह शेतकऱ्याने केली आहे.