खाऊच्या पैशांतून विद्यार्थ्याकडुन शाळेसाठी मिळाली पांडुरंगाची प्रतिमा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

बलायदुरी येथील जिल्हा परिषद शाळेत साजरे होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवात विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होऊन आनंदाची देवाण घेवाण होत असते. यावेळी सामाजिक उपक्रमातून आनंददायी जीवन जगण्याचा आनंद मिळत असतो. आज इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कार्तिक गटखळचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने कार्तिक गटखळ याने आज वरूथिनी एकादशीनिमित्त खाऊच्या पैशातून पांडुरंगाची प्रतिमा शाळेसाठी दिली. 

विद्यार्थी ओमकार भगत, प्रतिक साळवे, सोहम भगत, लवेश भगत, हर्षल भगत, नयन भगत, कृष्णा भगत, तेजश्री भगत, दिव्या भगत, महिमा गटखळ, सानिका भगत, पल्लवी गटखळ, श्रध्दा भगत, ज्ञानेश्वरी भगत या विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली. शिक्षक भिला अहिरे, सुनंदा अहिरे, मुख्याध्यापिका नलिनी फलके यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याबाबत माहिती दिली. आज वरूथिनी एकादशी असून संत निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी आहे. शाळेत आषाढी कार्तिकी एकादशी साजरी करतांना पांडूरंगाची प्रतिमा हवी असते. म्हणून माझ्या खाऊच्या पैशातून मी शाळेला पांडूरंगाचा प्रतिमा दिली असे कार्तिकने यावेळी सांगितले. शिक्षक सचिन गायकवाड, प्रशांत भदाणे, सरला सोनवणे, कीर्तीबाला बागुल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोहम भगत याने केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!