आयटी विभागाकडून मुंढेगाव जवळील बळवंतनगर येथील मेहुल चोकसीची ९ एकर २८ गुंठे जमीन जप्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी ईडीने मेहुल चोकसी आणि त्याच्या समुहाच्या एकूण 1217 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्यावर आयटी विभागाने आता त्याची इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीने गीतांजली जेम्स समुहाच्या मेहुल चोकसीची संपत्ती जप्त केली असून चोकसी यांच्या विरोधात रेड काॅर्नर नाेटीसही जारी केली आहे. चाेकसी याचे मुंबईमधले फ्लॅट्स, कोलकात्यामधला मॉल आणि हैदराबादमधील ज्वेलरी पार्क आयटी व इडीच्या ताब्यात असून त्यात मुंबईत 15 फ्लॅट, 17 आॅफिसचा समावेश आहे. तसेच आंध्रप्रदेश, हैदराबादमध्ये जेम्स एसईजी, कोलकातामधील शाॅपिंग माॅल, अलिबागमधील फार्म हाऊस आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये 231 एकर जमिनीवर टाच आणली आहे. आता

आयटीने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्जैक्शन अॅक्ट अंतर्गत बेनामीदार मेसर्स नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि बेनिफिशियल ओनर मेसर्स गीतांजली जेम्स लि. ची मालमत्ता जप्त केली आहे. बळवंतनंगर मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक, येथील जमीन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्त निहीत असतील आणि अशा जप्तीच्या संदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही असे आयटीने म्हटले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!